प्रतिनिधी /पणजी
आज मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी होणार असलेले सूर्यग्रहण हे आंशिक स्वरुपात दिसणार आहे. हे असे पहिलेच ग्रहण आहे जे सूर्यास्ताच्या काही मिनिटे अगोदर सुरू होत आहे. ग्रहण केवळ 1 तास 10 मिनिटे दिसणार आहे.
या ग्रहणाचे वेध पहाटे 3.39 वाजता सुरू होत आहेत. प्रत्यक्ष ग्रहण सायं. 4.39 वाजता सुरू होईल. ग्रहण मध्यकाल सायं. 5.43 वाजता तर ग्रहण मोक्ष काल सायं. 6.07 वाजता होईल. सूर्य अस्ताला जातानाच हे ग्रहण असल्याने भारतात ते सूर्य उगवेपर्यंत म्हणजेच दुसऱया दिवशी पहाटेपर्यंत आहे, असे मानले जाणार आहे.
यापूर्वी 1995 मध्ये दिवाळीला अशाच प्रकारचे सूर्यग्रहण आले होते. भारतात हे ग्रहण दिसणार असल्याने आजचे ग्रहण हे सर्वत्र पाळले जाईल. या ग्रहणानंतर 14 दिवसांनी चंद्रग्रहण होणार आहे.