Tarun Bharat

सौरऊर्जेद्वारे धावणारी कार लवकरच

Advertisements

पर्यावरण संरक्षणासाठी जीवाश्म इंधनाच्या पर्यायांवर मोठे काम सुरू आहे. वैज्ञानिक पर्यायी ऊर्जेने धावू शकणारी वाहनेही विकसित करू पाहत आहेत. याच प्रयत्नांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवरही काम होते. परंतु लाइटईयर नावाच्या डच कंपनीने सोलर पॅनेल असलेली कार निर्माण करत असल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारची ही पहिलीच कार नोव्हेंबरमध्ये युरोपच्या बाजारात दाखल होणार आहे.

लाइटईयर झिरो कारमध्ये वक्राकार सौरपॅनेल त्याच्या छतावर असतील, जे कारमधील बॅटरीशी जोडलेले असतील. ही कार सलग 388 मैलांचा प्रवास करू शकते, यात अतिरिक्त 44 मैलांचा प्रतिदिन प्रवास केवळ सौरपॅनेलद्वारे प्राप्त होऊ शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टेस्लाच्या मॉडेल 3 युक्त ईलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही अधिक चांगली ठरू शकते.

चार्जिंग पॉइंटवरील निर्भरता घटणार

लाइटईयरनुसार दर तासाला सूर्यापासून मिळणाऱया ऊर्जेद्वारे या कारची बॅटरी 6 मैलापर्यंत चार्ज होऊ शकणार आहे. हा प्रकार दीर्घ अंतराच्या प्रवासादरम्यान अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. यामुळे चार्जिंग पॉइंटवर कमी वेळ घालवावा लागणार आहे किंवा अनेकदा चार्जिंग पॉइंटची गरजच भासणार नाही.

गरजच नसेल

स्पेन किंवा पोर्तुगाल यासारख्या उष्ण देशांमध्ये दररोज 22 मैलापेक्षा कमी प्रवास करत असल्यास कार चार्जिंग करण्याच गरज 7 महिन्यांपर्यंत भासणार नाही. तर नेदरलँड सारख्या थंड हवामानाच्या देशात कारला दोन महिन्यापर्यंत चार्ज करावे लागणार नाही. इलेक्ट्रिक कारच्या या सुरुवातीच्या काळात चार्जिंग स्टेशन कमी असल्याने हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

कारचे वजन

लाइटईयर झिरो कार आणि दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लाइटईयर वनच्या प्रोटोटाइपमध्ये बरेच साम्य आहे. परंतु याची बॅटरी छोटी आहे. या कराचा आकार आणि चाकांमध्ये बसविण्यात आलेली मोटर याच्या बॅटरीचा आकार कमी करण्यास उपयुक्त ठरली आहे. यामुळे या कारचे वजन केवळ 1575 किलोग्रॅम राहिले आहे.

आणखी मॉडेल्स येणार

अन्य कंपन्या देखील सौरपॅनेल युक्त कार विकसित करत आहेत. सोनी सिओन कंपनीचे 2023 पर्यंत सौरऊर्जेद्वारे प्रतिदिन 10 मैलांचा प्रवास करू शकणारी कार सादर करण्याचे लक्ष्य आहे. अपटेरा नेव्हर चार्ज कंपनी देखील प्रतिदिन 40 मैल प्रवास करू शकेल अशी सौरपॅनेलयुक्त कार सादर करणार आहे. या कारसाठी आताच 24 हजार जणांनी नोंदणी केली आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरणे

prashant_c

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

12 वर्षीय मुलीचा ‘पॉवरफुल’ पंच

Patil_p

जातनिहाय जनगणनेची बिकट वाट…

Patil_p

सीमेपासून 1500 कि.मी.पर्यंत सर्वकाही टिपणार ‘तिसरा डोळा’

Patil_p

मृतदेहांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयोग

Patil_p
error: Content is protected !!