बेळगाव : येडूरवाडी येथील लष्करी सेवा बजावणारे सुरज धोंडीराम सुतार यांचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव विमानाने बेळगाव येथे आणण्यात आले.
सांबरा विमानतळावर जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच व्ही यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर श्रद्धांजली अर्पण केली.