Tarun Bharat

चहा निर्यातीत काहीशी घट

मागील आर्थिक वर्षातील स्थिती ः घटीसह 20 कोटी किलोग्रॅमवर निर्यात

वृत्तसंस्था/ कोलकाता

मागील आर्थिक वर्षात (2021-22)मध्ये झालेल्या चहा निर्यातीत काही प्रमाणात घट राहिली आहे. या घटीसह निर्यात 20.07 कोटी किलोग्रॅमवर राहिली आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षात देशात 20.37 कोटी किलोग्रॅम चहा निर्यात झाली होती, अशी आकडेवारी चहा मंडळाकडून देण्यात आली आहे.

भारतीय चहा सर्वात मोठा आयातक असून सीआयएस देशांकडून होणारा उठाव मागील आर्थिक वर्षात घटून 4.24 कोटी किलोग्रॅमवर राहिला असून यामध्ये 2020-21 च्या दरम्यान हा आकडा 4.90 कोटी किलोग्रॅमवर राहिला होता.

सीआयएसनंतर दुसरा सर्वात मोठा आयातक हा इराण असून या देशाची निर्यात मागील वर्षातील समान कालावधीत 2.83 कोटी किलोग्रॅम काहीशी वाढून ती 2.92 कोटी किलोग्रॅमवर राहिली आहे. यावेळी चहा मंडळाने म्हटले आहे, की संयुक्त अरब अमीरात यांनी मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान 2.32 कोटी किलोग्रॅम चहा भारताकडून घेतला आहे. त्या अगोदर हा आकडा 1.36 कोटी किलोग्रॅम राहिल्याची माहिती आहे.

दुसऱया बाजूला अमेरिकेने भारताकडून 1.34 कोटी किलोग्रॅम चहा आयात केला असून या अगोदरच्या आर्थिक वर्षात 1.20 कोटी किलोग्रॅम आकडा राहिला होता. मागील आर्थिक वर्षात ब्रिटनमध्ये चहा आयातीत घट होत 1.01 कोटी किलेग्रॅम राहिली आहे.

मागील आर्थिक वर्षातील मूल्याच्या हिशोबात चहा निर्यात 5,415.78 कोटी रुपयांची राहिली असून ही मागील आर्थिक वर्षात 5,311.53 कोटी रुपयांवर राहिली होती.

Related Stories

भरमसाठ वैद्यकीय शिक्षण शुल्काला चाप

Patil_p

नितीशकुमार आज शपथबद्ध होणार

Patil_p

निर्भयाच्या चारही दोषींना तिहार तुरूंगात फाशी

tarunbharat

देशात 12 तासात 240 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

देशातील रुग्णसंख्या 8 लाखांच्या जवळ

Patil_p

मदरशांमध्ये आता रामायण अन् भगवद्गीतेचे शिक्षण

Patil_p
error: Content is protected !!