दसरा मेळाव्यावेळी ठाकरे गटातील काही आमदार शिंदे गटात येणार
सांगली/प्रतिनिधी
राजकारणात शरद पवार हे मोठे नेते मात्र देशात डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. तसेच इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही. मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. तर ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्यावेळी शिंदे गटात येण्याची शक्यता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना शहाजी बापू म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
विरोधकांच्या ५० खोके घेतल्याच्या टीकेवर बोलताना ते, म्हणाले इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही. मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत. तसेच ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी शिंदे गटात येण्याची शक्यता ही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी वर्तवली. तसेच ठाकरे आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये जमीन असमानता फरक असून, महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री शिंदे असताना होत आहेत..
असं ही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.