उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. मग यासाठी वेगवेगळी फळे,ज्यूस,पिण्याचा सल्ला देखील दिला जातो.पण शरीराबरोबर आपल्या त्वचेलादेखील हायड्रेट ठेवणं तितकचं गरजेचे आहे.कडक ऊन, गरम हवा आणि धूळ-मातीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर याचा दुष्परिणाम होतो. अशावेळी उन्हाळ्यात त्वचा डिहायड्रेट होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गुलाब पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते.सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे त्वचेवर लावा.
काकडी त्वचेची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर मानली जाते. काकडी किसून त्याचा रस काढून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल.
चेरीचे पाणीही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चेरी त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर याचा वापर करा. असे केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ग्रीन टी टाका आणि उकळू द्या. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होईल.
गुलाब पाणी आणि कोरफड एकत्र मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा उपाय उन्हाळ्यामध्ये अधिक फायदेशीर ठरतो.

