डोळे हा स्त्रियांच्या सौंदर्यातील महत्वाचा घटक आहे. जर डोळ्यांचा मेक अप नीट असला तर तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी उठून दिसते.डोळ्यांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर त्यांना खुलवण्यासाठी काजळ, लायनर, आयशॅडो, मस्कारा या किमान गोष्टी लावल्या जातात. पण या गोष्टी योग्य रित्या लावायला हव्यात. नाहीतर तुमचा पूर्ण लूक खराब होऊ शकतो.म्हणूनच आज जाणून घ्या डोळ्यांच्या मेकअपच्या काही टिप्स…
डोळ्यांना काजळ किंवा लायनर लावताना अति ठळक किंवा ब्रॉड लावू नये. याने डोळ्यांखाली काळं होण्याची शक्यता असते.
आय मेकअप डार्क करणार असाल तर लीप मेकअप लाइट असावा. दोन्हीही डार्क असल्यास मेकअप भडक दिसतो.
लग्नासाठी किंवा खास कार्यक्रमासाठी संपूर्ण डोळ्याचा मेकअप करायचा झाल्यास प्रथम आयशॅडोज लावाव्या, त्यानंतर लायनर मग काजळ आणि शेवटी मस्कारा लावावा. यामुळे मेकअप खराब होत नाही.
सकाळचा कार्यक्रम असल्यास लाइट शेड्सच्या आयशॅडोज वापराव्या व रात्रीच्या कार्यक्रमासाठी डार्क शेड्स वापरावेत.
जर तुमचे डोळे लहान असतील तर डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यात ओढून वरच्या बाजूला आयलायनर किंवा काजल पेन्सिल लावा. खालच्या बाजूला मस्करा लावा आणि दोन ओळी एकत्र करा.
संध्याकाळच्या पार्टीसाठी डोळ्यांना स्मोकी लुक द्या. यामुळे तुमच्या वेस्टर्न आउटफिट्ससोबत स्मोकी लूक परफेक्ट होईल. लक्षात ठेवा की आयशॅडो जास्त स्मज करू नकात.
मेकअप काढायच्या वेळी तो आय-मेकअप रिमूव्हर सोल्यूशनने किंवा खोबरेल तेलाने काढावा. डोळ्यांचा मेकअप तसाच ठेवून झोपल्यास डोळे लाल होतात.


previous post