वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. रविवारी विल्यम्सनने आपल्या ट्विटरवर ही आनंदाची बातमी प्रसिद्ध केली.
विल्यम्सनची पत्नी सारा रहीमने रविवारी आपल्या दुसऱया अपत्याला जन्म दिला. यापूर्वी विल्यम्सनला पहिली मुलगी आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सनराजयर्स हैदराबाद संघाचे आव्हान समाप्त झाले आहे. आता विल्यम्सन इंग्लंडविरूद्ध जून महिन्यात सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे.