Tarun Bharat

सोनाक्षी अन् हुमा चित्रपटासाठी एकत्र

Advertisements

डबल एक्सएल चित्रपटात मुख्य भूमिकेत

आतापर्यंत तुम्ही पुरुष किंवा मुलांकडून महिलांचे बॉडी शेमिंग होताना पाहिले असेल. परंतु महिला आणि मुलींनी हा प्रकार सुरू केल्यास काय होईल याचा विचार करा. बॉडी शेमिंग, महिलांचे स्थुलत्व आणि त्याबद्दल लोकांच्या दृष्टीकोनाला दर्शविणारा एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘डबल एक्सएल’ असून याचा टीझर सादर करण्यात आला आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत आहे.

डबल एक्सएल चित्रपटासाठी सोनाक्षी अन् हुमाने अनेक किलो वजन वाढविले आहे. चित्रपटात अभिनेता जहीर इक्बाल देखील दिसून येणार आहे. हुमा आणि सोनाक्षीने चित्रपटासाठी सुमारे 15-20 किलो वजन वाढविले असल्याचे जहीरनेच सांगितले आहे. डबल एक्सएल चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केले आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचदिवशी आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह यांचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

17 वर्षांनी बॉलिवूडमध्ये नागार्जुनचे पुनरागमन

Patil_p

रियाच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

Rohan_P

सिद्धार्थ आणि पायल झळकणार ‘तू गणराया’ या गाण्यात

Patil_p

तब्बल 8 वर्षांनी उमेश – मुक्ता एकत्र दिसणार छोट्या पडद्यावर!

Rohan_P

अमेरिकेत 5 मित्रांची अनोखी परंपरा

Amit Kulkarni

‘झिम्मा’चा खेळ रंगणार 19 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

Patil_p
error: Content is protected !!