प्रेमाच्या नात्याची दिली जाहीर कबुली
सोनाक्षी सिन्हा मागील काही काळापासून झहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. झहीर अन् सोनाक्षीने अलिकडेच स्वतःच्या या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. सोनाक्षीच्या सोशल मीडिया पोस्टवर वरुण शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि पत्रलेखा यासारख्या कलाकारांनी कॉमेंट केली आहे. सोनाक्षी आणि झहीर काही दिवसांपूर्वी एका विवाहसोहळय़ात एकत्र दिसून आले होते.
झहीर हा एका ज्वेलर्सच्या कुटुंबाशी संबंधित असून सलमान खानचा तो चांगला मित्र आहे. झहीरने स्वतःचे बॉलिवूड पदार्पण सलमान खानचा चित्रपट ‘द नोटबुक’द्वारे केले होते. झहीर आणि सोनाक्षी आता ‘डबल एक्स एल’ या चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. सतराम रमानी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या चित्रपटात हुमा कुरैशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सोनाक्षी बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नसली तरीही तिच्या नावावर काही हिट चित्रपट आहेत. परंतु अलिकडच्या काळात ती बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून आलेली नाही.