दक्षिणेतील सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांच्या चित्रपटाची प्रतीक्षा त्यांचे चाहते अत्यंत आतुरतेने करत असतात. नंदामुरी हे सध्या स्वतःचा आगामी चित्रपट एनबीके 108 वीर सिम्हा रेड्डीच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. त्यांनी दिग्दर्शक अनिल रविपुदी यांच्यासोबत या चित्रपटावर काम सुरू केले आहे. या चित्रपटाची निर्मिती शाइन स्क्रीन्स बॅनर अंतगंत स्टार हरीश पेडी करत आहेत. त्यांच्या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये एका तुरुंगाचा सेट उभारण्यात आला आहे. आता नंदामुरी यांची नायिका म्हणून या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आल्याचे समजते.
एनबीके108 या चित्रपटात बालय्या यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिसून येणार आहे. सोनाक्षी सिन्हाची याकरता निवड करण्यात आली आहे. सोनाक्षीने नंदामुरी यांच्यासोबत काम करण्यासाठी मोठी रक्कम मागितली होती. दिग्दर्शक अनिल रविपुडी हे सोनाक्षीला पटकथा ऐकविण्यासाठी मुंबईत आले होते आणि त्यांनी तिचा होकार मिळविला आहे.
एनबीके 108 हा ऍक्शन ड्रामा धाटणीचा चित्रपट असून यात श्रीलीलाने बलय्यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तर सोनाक्षी त्यांची नायिका म्हणून काम करत आहे. तसेच या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेता दिसून येणार आहे. अर्जुन रामपालला यात महत्त्वाची भूमिका मिळाली आहे.
सोनाक्षीने यापूर्वी रजनीकांत आणि अनुष्का शेट्टी यांच्या लिंगा या चित्रपटात काम केले होते. 62 वर्षीय नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना किती पसंत पडते हे आता पहावे लागेल.