प्रियकर विकाससोबत लवकरच करणार विवाह
अभिनेत्री सोनारिका भदौरियाने प्रियकर विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे. सोनारिकाने या सोहळय़ाची छायाचित्रे शेअर केली आहेत. छायाचित्रांमध्ये सोनारिका अत्यंत सुंदर दिसून येत आहे.
सोनारिका आणि विकास परस्परांना 7 वर्षांपासून डेट करत आहेत. अखेर या दोघांनी स्वतःच्या नात्याला नवे अन् सुखद वळण दिले आहे. सोनारिका आणि विकासने काही काळापूर्वीच एंगेजमेंट केली होती, ज्याची छायाचित्रे अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या जोडप्याच्या छायाचित्रांवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोनारिकाने टीव्ही शो ‘देवों के देव महादेव’द्वारे देशभरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर ‘पृथ्वी वल्लभ ः इतिहास भी, रहस्य भी’, ‘इश्क में मरजावां’ यासारख्या अनेक टीव्ही सीरियल्समध्ये तिने काम केले आहे.
सोनारिकाने 2011 मध्ये ‘तुम देना साथ मेरा’ या टीव्ही शोमधून मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने 2015 मध्ये तेलगू चित्रपट ‘फ्लिक’, ‘जादुगाडु’मध्येही काम केले होते. 2018 मध्ये सोनारिकाने हिंदी टीव्ही शोमध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. सद्यकाळात ती ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरिजकरता काम करत असल्याची चर्चा आहे.