वृत्तसंस्था/ मेट्झ (फ्रान्स)
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या मेट्झ मोझली खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोने एकेरीचे जेतेपद मिळविताना कझाकस्तानच्या बुबलिकचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सोनेगोने बुबलिकचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. या सामन्यापूर्वी सोनेगोने या स्पर्धेतील विद्यमान विजेता आणि दहावा मानांकित हुरकेझचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. 2022 च्या टेनिस हंगामात सोनेगोने 24 सामने गमावले असून 18 सामने जिंकले आहेत.