Tarun Bharat

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल; काँग्रेस नेत्याचा इशारा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

नागपूर : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटवून देऊ, असा इशारा काँग्रेस नेते शेख हुसैन यांनी दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीसमोर चौकशी सुरु आहे. यावरुन देशभरात काँग्रेस नेते रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करीत आहेत. दरम्यान शेख हुसैन (Sheikh Hussein) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जे काम करायचे आहे ते बाजूला ठेवून मोदी सरकार अनावश्यक काम करीत आहेत अस वक्तव्य त्यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेख हुसैन यांच्याविरुद्ध नागपूरमधील (Nagpur) गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – आता अयोद्ध्येत उभारणार ‘महाराष्ट्र सदन’; पर्यावरण मंत्र्यांची मोठी घोषणा


शेख हुसैन यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, अहिंसेचा संबंध महात्मा गांधींशी आहे आणि हे लोक हिंसा करीत आहे. काँग्रेसचे (congress) लोक हिंसक झाले आहेत. आता ते पंतप्रधानांनाही ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ते महात्मा गांधींच्या नावाने निदर्शने करण्याचे कसे बोलत आहेत? असा सवालही त्यांनी केली.

शेख हुसैन यांना पश्चाताप नाही

आपल्या वक्तव्यावर शेख हुसैन म्हणाले, नरेंद्र मोदींवर केवळ म्हण म्हणून टिप्पणी केली होती. याला चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. मी म्हण म्हणून जे बोललो त्याला वेगळ्याच पद्धतीने सादर केले जात आहे. मला माझ्या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप नाही. असे

Related Stories

भाजपने सोडविली भय अन् भुकेची समस्या

Patil_p

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Abhijeet Shinde

बिहारमध्ये आहे एक ‘असा’ही आमदार!

datta jadhav

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी संजयकुमार यांची नियुक्ती

Rohan_P

भारतीय विद्यार्थ्याला नासाच्या स्पर्धेत विजेतेपद

Patil_p

राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav
error: Content is protected !!