Tarun Bharat

सोनियांनी ईडीकडे मागितला अधिक वेळ

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण ः प्रकृतीचे कारण केले पुढे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली आहे.  त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला दिला आहे. याबाबत सोनियांनी ईडीला पत्र लिहिले आहे. सोनिया गांधी यांना ईडीने 23 जून रोजी चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्याची माहिती आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. मात्र, त्यांना वाढीव वेळ देण्याबाबत ईडीने बुधवारी सायंकाळपर्यंत कोणतीही स्पष्टोक्ती दिलेली नव्हती.

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी मंगळवारी ईडीने राहुल गांधींची पाचव्या दिवशी चौकशी केली. सकाळपासून सतत 10 तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधींना रात्री 8.15 च्या सुमारास 30 मिनिटांचा ब्रेक मिळाला. यानंतर ते पुन्हा 9.45 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. मंगळवारी रात्री अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर प्रियांका गांधी स्वतः राहुल गांधींना ईडी कार्यालयात सोडण्यासाठी आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. राहुल यांची बुधवारी चौकशी झालेली नाही. गेल्या आठवडय़ापासून पाच दिवसांत राहुल यांची आतापर्यंत 50 तास चौकशी करण्यात आली आहे.

Related Stories

मुंबईनंतर दिल्लीतही हजारो मजूर रस्त्यावर

prashant_c

भगवंत मान यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p

पंजाबमध्ये काँग्रेसकडे शेवटची संधी

Patil_p

केरळमध्ये विझिंजम बंदर प्रकल्पाला विरोध

Patil_p

हरियाणा : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, सोबत देणार 5 मास्क

Tousif Mujawar

संयुक्त किसान मोर्चाची 26 जूनला राजभवनांसमोर निदर्शने

datta jadhav