नवी दिल्ली
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी ईडीसमोर हजर होऊ शकल्या नाहीत. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्यावतीने अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आणखी वेळ मागितला गेला आहे. गेल्या आठवडय़ात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतरही अहवाल निगेटिव्ह आलेला नाही. परिणामतः सध्या त्या तातडीने ईडीच्या अधिकाऱयांसमोर हजर राहणार नाहीत. सोनियांबरोबरच राहुल गांधी यांनाही ईडीच्या अधिकाऱयांनी पाचारण केलेले आहे. त्यांना 13 जूनपूर्वी ईडी कार्यालयात हजर राहण्याची मुदत देण्यात आली आहे.