Tarun Bharat

सोनिया गांधी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी शनिवारी ट्विट करत दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान राहुल गांधी यांनादेखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला आहे.

सोनिया गांधी यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2 जून 2022 ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जूनमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्या आपल्या निवासस्थानीच विलगीकरणात राहत आहेत.

Related Stories

गो-एअरच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Amit Kulkarni

‘योद्धय़ां’ना 13 रोजी लसीचा दुसरा डोस

Patil_p

केंद्र सरकारकडून 4 कोटी 39 लाख रेशनकार्ड रद्द

datta jadhav

पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ

Patil_p

प. बंगालमध्ये उद्यापासून अंशत: लॉकडाऊन

datta jadhav

उत्तर प्रदेशात अपघातात 12 भाविकांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!