Tarun Bharat

सोनिया गांधी यांची चौकशी लांबणीवर

‘ईडी’कडून मागणी मान्य : आता जुलैअखेरीस पाचारण शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची विनंती मान्य करत त्यांना आणखी काही दिवसांची मुदत दिली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी त्यांची गुरुवारी चौकशी होणार होती. मात्र, प्रकृतीचे कारण देत त्यांनी आणखी काही दिवस मुदतवाढ मागितली होती. आता त्यांची चौकशी जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्मयता आहे.

सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी घरी आराम करण्याचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांनी ईडीला पत्र लिहून आपली प्रकृती पूर्ण बरी होईपर्यंत हजर होण्याची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे. सोनिया गांधी यांना सोमवारी, 20 जून रोजीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनामुळे झालेल्या त्रासामुळे त्यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 75 वषीय सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित प्रकरणात ईडीने सोनियांना 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेकडे काही वेळ मागितला होता. यानंतर ईडीने त्याला 23 जूनला हजर राहण्यास सांगितले. आता त्यांनी ईडीकडे आणखी तारीख वाढवण्याची विनंती केली असून तपास यंत्रणेने ती मान्य केली आहे. मात्र, पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही.

काँग्रेसचे केंद्रावर आरोप नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधींची गेल्या दोन आठवडय़ात 5 दिवसात 50 तास चौकशी केली. दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केंद्रावर केला असून या संपूर्ण कारवाईला राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र

Patil_p

बडगाममध्ये वैद्यकीय पथकावर हल्ला

Patil_p

‘खेलरत्न’ला मेजर ध्यानचंद यांचे नाव!

Patil_p

पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी साधला संवाद

Abhijeet Shinde

चिंता वाढली : दिल्लीत एका दिवसात 1024 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

झारखंडमध्ये 10 जूनपर्यंत वाढविले ‘मिनी लॉकडाऊन’

Rohan_P
error: Content is protected !!