मडगाव अग्निशामक दलाकडून सायंकाळपर्यंत आग आटोक्यात, कुंकळ्ळी, फोंडा व कुडचडे येथून अतिरिक्त बंब मागविले
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा कचरा यार्डमध्ये शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा कचऱयाला आग लागण्याची घटना घडली. दुपारी पावणेदोन वाजता कॉल आल्यानंतर मडगाव अग्निशामक दलाने कुंकळ्ळी, फोंडा व कुडचडे येथील अतिरिक्त बंब मागवून या आगीवर निमंत्रण मिळविले. सायंकाळी उशिरापर्यंत आग लागलेल्या ठिकाणी मातीचे भराव टाकून आग आणखी फैलावू नये यासाठी प्रयत्न केले जात होते.
मडगाव अग्निशामक दलाला मनोविकास हायस्कूलजवळच्या बाजूने गवताला आग लागल्याचा कॉल दुपारी साडेबारा वाजता मिळाला असता सदर आग आम्ही विझवून गेले होतो. नंतर पावणेदोन वाजता सोनसडा यार्डात आग लागल्याचा कॉल आल्यानंतर मडगाव अग्निशामक स्थानकाचे दोन बंब घेऊन सोनसडय़ावरील आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु आग आटोक्मयात येत नसल्याने कुंकळ्ळी, कुडचडे व फोंडा येथून बंब मागविण्यात आले व आग आटोक्मयात आणली गेली, अशी माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील यांनी दिली.
जेसीबीचा टायर पंक्चर झाल्याने अडथळा
आग आणखी फैलावू नये यासाठी आग लागलेल्या ठिकाणी मातीचे भराव टाकत असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. पालिकेच्या जेसीबी यंत्राचा टायर पंक्चर झाल्याने आग विझविण्याच्या कामात अडथळे आले. नंतर बायोरेमेडिएशन काम करणाऱया गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून जेसीबी यंत्र आणून सदर आग विझविण्याचे काम करण्यात आले.
मिथेनमुळे आग ?
सोनसडा यार्डाला वरचेवर आग लागण्याचे प्रकार सुरूच असून शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी सध्याच्या कडाक्मयाच्या उन्हाळात तापमान वाढले असल्याने कचऱयाच्या ढिगाऱयांमध्ये मिथेन वायू तयार होऊन आग लागल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
आमदार लॉरेन्सकडून संताप
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सोनसडय़ावर वरचेवर आग लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना मडगाव पालिकेकडून सोनसडय़ाकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच गांभीर्याचा अभाव असल्याबद्दल लॉरेन्स यांनी संताप व्यक्त केला.
गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी : शॅडो कौन्सिल
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने सोनसडा येथील शुक्रवारच्य आगीच्या घटनेची गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही आगीची घटना मानवनिर्मित असल्याचा थेट आरोप करत शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी, आग लागण्याचे कारण मिथेन वायू आहे असे अंध व्यक्तीनेही मानण्याचे कोणतेही कारण नाही, ते एक कायमचे निमित्त बनले आहे, अशी टीका केली आहे.
आगीच्या घटनेच्या ठिकाणी अशा कोणत्याही मिथेन वायू सिद्धांताची चिन्हे नाहीत. पालिकेच्या काही अधिकाऱयांकडून हे ऐकणे खरोखरच धक्कादायक होते की, आग मनोविकास शाळेच्या कंपाऊंडमधून पसरली, जिथे किरकोळ आगीची घटना घडली होती. आपण व्यक्तिशः संध्याकाळी सव्वाप?ाचपर्यंत आग विझवली जाईपर्यंत सोनसडा येथे आगीच्या ठिकाणी उपस्थित होतो. या घटनेत काही स्वार्थी घटकांचा हात आहे, असा आरोप कुतिन्हो यांनी केला.
सोनसडय़ाच्या बाजूला कॅमेरे बसवा : कुतिन्हो
जर पालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारला ही सोनसडा गाथा वंशजांसाठी जतन करायची असेल, तर सरकारी कार्यालयांऐवजी सोनसडय़ाच्या आजुबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येतील असे आम्ही सूचवतो. हे वारंवार घडणाऱया अग्नी षड्यंत्रसाठी प्रतिबंधक ठरू शकते आणि आगीच्या घटनांमुळे आसपासच्या रहिवाशांना आणि अग्निशामक दलाला होणाऱया त्रासांपासून ते वाचवेल, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
पालिका जवानाच्या दलांना पाणीही पुरविण्यात अपयशी
शॅडो कौन्सिलने अग्निशामक अधिकारी गील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले आहे. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे सुमारे चार तासांत आग आटोक्मयात आली. पालिका अग्निशमन कर्मचाऱयांना पिण्यासाठी पाणी देखील पुरवण्यात अयशस्वी ठरली. त्यांनी धूर आणि उष्णता, दुपारच्या कडक उन्हात जेवणाशिवाय काम केले, असे सांगून कुतिन्हो यांनी याबद्दल खेद व्यक्त केला. शॅडो कौन्सिलने त्यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या आणि काही स्नॅक्स पुरवले, असे त्यांनी सांगितले.
आम्ही सरकारला या आगीच्या घटनेच्या गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत चौकशीचे आदेश देण्याचे धाडस करण्यास सांगतो. त्याचप्रमाणे भूतकाळातील किमान एक तरी आगीच्या घटनेचा खरा व प्रामाणिक अहवाल सार्वजनिक करावा, असे आवाहन करतो. आगीची घटना घडणे, लोकांनी त्रास सहन करणे, सरकारी खर्चाने आग विझवणे आणि पुढील आगीच्या घटनेपर्यंत लागलेल्या आगीची घटना विसरणे हे नित्याचेच झाले आहे, असे म्हणून कुतिन्हो यांनी खेद व्यक्त केला आहे.