जनावरांना पावसाळी आजारांची लागण रोखण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत उपाययोजना
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना ओल्या चाऱयातून होणारे आजार रोखण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जंतुनाशक औषधांचे वितरण केले जाणार आहे. पावसाळय़ाच्या दिवसात जनावरांना ओल्या चाऱयातून विविध आजारांची लागण होते. या पार्श्वभूमीवर खात्याने औषधे वितरणाचा निर्णय घेतला आहे. लवकरच जिल्हय़ातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातून ही औषधे पशुपालकांना दिली जाणार आहेत.
जुलै प्रारंभापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र ओला चारा आला आहे. जनावरांना या चाऱयातून विविध आजारांची लागण होत असते. यासाठी पशुसंगोपन खाते जंतुनाशक औषध वितरण मोहीम राबविणार आहे. विशेषतः रानात चरायला जाणाऱया गाय, म्हैस आणि शेळय़ा-मेंढय़ांना विविध आजार उद्भवण्याची शक्मयता असते. दरम्यान, वेळेत उपचार आणि लसीकरण होणेही आवश्यक आहे. यासाठी खात्यामार्फत ही जंतुनाशक मोहीम राबविली जाणार आहे.
जनावरांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, गाढव, घोडा, डुक्कर, शेळय़ा-मेंढय़ा यांचा समावेश आहे. पावसाळय़ात या जनावरांना विविध साथीच्या रोगांची लागण होत असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी खात्यामार्फत मोहीम राबविली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लसीकरण आणि जंतुनाशक औषधांची वितरण मोहीम थंडावली होती. मात्र यंदा पुन्हा मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना आणि शेळय़ा-मेंढय़ांना जंतुनाशक औषधे आणि लसीकरण करून घेऊन रोगापासून दूर ठेवावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्यातर्फे करण्यात आले आहे.
जंतुनाशक औषधांचे पशुपालकांना वितरण करणार
जनावरांना पावसाळय़ात चाऱयातून आजाराची लागण होते. यासाठी जिल्हय़ात रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. शिवाय पशुपालकांना जंतुनाशक औषधांचे वितरण केले जाणार आहे. पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा.
– डॉ. राजीव कुलेर, उपनिर्देशक पशुसंगोपन खाते