वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे आयपीएलमध्ये पुनरागमन होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया दिल्ली कॅपिटल्स संघाच्या क्रिकेट संचालकपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याचे समजते.
येत्या एप्रिल महिन्यात 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलावही डिसेंबर महिन्यात झाला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये सौरव गांगुली यांची भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळाच्या अध्यक्षपदाची संपुष्टात आली होती. सौरव गांगुलीबरोबर आयएल टी-20 स्पर्धेतील दुबई कॅपिटल्स तसेच दक्षिण आफ्रिका टी-20 लिग स्पर्धेतील प्रेटोरिया कॅपिटल्स संघांच्या फ्रांचायजीनी संपर्क साधला होता पण यावर्षी सौरव गांगुली यांचे आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाद्वारे पुनरागमन होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.