वृत्तसंस्था / कोलकाता
ओडिशी नर्तिका डोना गांगुली या बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पत्नी आहेत. डोना या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिल्या असल्या तरीही आता त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलींच्या घरी भोजन केल्यापासून भाजप डोना यांना राज्यसभा सदस्यत्वाची संधी देऊ शकतो असे बोलले जात आहे.
कलम 80 (1) (अ)नुसार राष्ट्रपती राज्यसभेसाठी 12 सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात. रुपा गांगुली आणि स्वप्न दासगुप्ता यांच्यासह 12 जणांपैकी 5 जणांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांमध्ये मेरी कोम आणि सुब्रमण्यम स्वामी यांचा समावेश आहे.
डोना गांगुली यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारणा झाली असता भाजप उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी यासंबंधी माहिती नसल्याचे सांगितले. बंगालमधून कुणाला राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाणार की नाही हे देखील मला माहित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोष तसेच बंगाल भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याने या चर्चेला फेटाळून लावलेले नाही. तसेच तृणमूल काँग्रेसने याबद्दल प्रतिक्रिया देखील देणे टाळले आहे.
कौटुंबिक संबंध ः डोना
डोना यांच्या निकटवर्तीयांनी ही चर्चा फेटाळली आहे. अमित शाह हे एक कौटुंबिक मित्र असून दीर्घकाळापासून गांगुली कुटुंबाला ओळखतात. रात्रीच्या भोजनासाठी त्यांचे आदरातिथ्य करण्याचा राजकारणाशी कुठलाच संबंध नसल्याचे डोना यांनी म्हटले आहे. डोना या कोलकाता शहरात शास्त्राrय नृत्य विद्यालय चालवितात. शाह यांनी शुक्रवारी गांगुली यांच्या घराला भेट दिली होती. त्यांच्या या दौऱयानंतर डोना यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला प्रारंभ झाला आहे.