Tarun Bharat

दक्षिण आफ्रिकेत पुराचा कहर, जनजीवन विस्कळीत

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दक्षिण आफ्रिकेत महापूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुरामुळे येथील परिस्थिती भयंकर झाली आहे. आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांताला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. आतापर्यंत या महापुरात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजार लोक बेघर झाल्याची माहिती समोर आली आहे.

महह महापूर इतका भयंकर आहे की, दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील डर्बन शहराच्या काही भागात पाणी शिरले. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर पाण्याच्या प्रवाहाने काही लोकं या पाण्यात वाहून गेली आहेत. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की, डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे ५२ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

येथील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या महापुरामुळे मृतांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे. तर २७ लोकं बेपत्ता झाले आहेत. तसेच ४० हजारांहून अधिक लोक बेघर झाल्याची माहिती सुद्धा सरकारने दिली आहे. घरांमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, डर्बन जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या एका कुटुंबातील १० सदस्यांपैकी एकाचाही अद्याप शोध लागलेला नाहीये.

Related Stories

अमेरिकेच्या सैन्याची माघारी….

Patil_p

सात हजारांहून अधिक गावांना मिळणार 4G कनेक्टिविटी

datta jadhav

राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांश ठिकाणचं तापमान १५ अंशांखाली

Abhijeet Khandekar

टेनिस खेळण्यात तरबेज श्वान

Patil_p

हसन मुश्रीफांच्यावर गुन्हा दाखल, मुरगुडात कार्यकर्ते आक्रमक

Archana Banage

आरबीआयचं डिजिटल चलन येणार

Archana Banage