वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेची माजी कर्णधार डेन व्हेन निकर्क हिने गुरुवारी क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. 29 वर्षीय निकर्कने दक्षिण आफ्रिका संघाकडून एकमेव कसोटी, 107 वनडे आणि 86 टी-20 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकन महिला संघातील ती एक उपयुक्त अष्टपैलू म्हणून ओळखली गेली. एकमेव कसोटी सामन्यात तिने 22 धावा जमवल्या होत्या आणि गोलंदाजीत एक बळी मिळवला होता. तिने 107 वनडे सामन्यात 138 बळी मिळवले असून फलंदाजीत तिने 2175 धावा धावा जमवल्या. टी-20 प्रकारातील 86 सामन्यात तिने फलंदाजीत 1877 धावा केल्या. 2021 साली झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत निकर्कचा दक्षिण आफ्रिकन महिला संघात समावेश होता. मात्र 2023 च्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निकर्कला संघातून वगळण्यात आले होते.