वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 27 जानेवारीपासून वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. बेहुमाकडे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सोपविण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज सिसांदा मॅगेला आणि मार्को जेनसेन यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 27 जानेवारीला ब्लोमफाऊंटन येथे, दुसरा वनडे सामना 29 जानेवारीला ब्लोमफाऊंटनमध्ये तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 1 फेबुवारीला किंबर्लेत खेळविला जाणार आहे. 2020-23 च्या आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत ही मालिका राहील. अलीकडेच दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत एकतर्फी पराभूत केले होते. यानंतर शुक्री कोनार्दकडे गोलंदाज प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविली होती.
दक्षिण आफ्रिका संघ- टी. बवुमा (कर्णधार), डि कॉक, क्लासेन, व्हान डर डय़ुसेन, केशव महाराज, हेंड्रीक्स, जान्सेन, सिसांदा मगाला, मलान, मार्करम, डेव्हिड मिलर, एन्गिडी, नॉर्त्जे, पार्नेल, रबाडा आणि शम्सी.