यजमान इंग्लंडविरुद्ध तिसरी व शेवटची कसोटी
ओव्हल / वृत्तसंस्था
ऑलि रॉबिन्सनच्या डावातील 5 बळीच्या जोरावर इंग्लंडने येथील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावांमध्ये गुंडाळला. रॉबिन्सनने 49 धावात 5 बळी घेतले. यापैकी 4 बळी त्याने उपाहारापूर्वी अवघ्या 21 धावांमध्ये गारद केले होते. उपाहारानंतर स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेला आणखी धक्के दिले. त्याने 41 धावात 4 बळी, असे पृथक्करण नोंदवले.
या सामन्यात केवळ तीन दिवसांचा खेळ होणार असून बेन स्टोक्सने नाणेफेक झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय 48 तासांपूर्वी घेतला होता. गुरुवारी पावसाचा व्यत्यय आल्याने आणि शुक्रवारी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर शनिवारी तिसऱया दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः 36.2 षटकात सर्वबाद 118 (मार्को जान्सन 4 चौकारांसह 30, झोन्डो 57 चेंडूत 23, केशव महाराज 18. अवांतर 6. ऑलि रॉबिन्सन 14 षटकात 5-49, स्टुअर्ट ब्रॉड 4-41, जेम्स अँडरसन 1-16).