Tarun Bharat

स्पेनचा अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था /हॅम्बुर्ग (जर्मनी)

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅम्बुर्ग युरोपियन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या अल्कारेझने गुरुवारी सर्बियाच्या फिलिप पेजिनोक्हिकचा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.

गुरुवारी झालेल्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने पेजिनोव्हिकचा 7-6 (7-4), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात अल्कारेझने आपल्या अचूक आणि वेगवान सर्व्हिसवर तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. या लढतीतील पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. पण टायब्रेकरमध्ये स्पेनच्या अल्कारेझने पेजिनोव्हिकवर मात केली. दुसऱया सेटमध्ये पेजिनोव्हिककडून अल्कारेझला म्हणावा तसा प्रतिकार झाला नाही. अलीकडच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अल्कारेझने अनेक सीडेड खेळाडूंना पराभूत केले आहे.

Related Stories

विश्व टेटे स्पर्धेत भारताची किमान दोन पदके निश्चित

Patil_p

सौरभ चौधरी, महिला नेमबाजी संघाला कांस्यपदके

Amit Kulkarni

प्रशिक्षक क्लुसनरच्या वेतनामध्ये कपात

Patil_p

मुंबईचा इंडियन्सचा ‘तो’ व्हीडिओ काय सांगतो?

Patil_p

दुसऱया डब्ल्यूटीसीसाठी गुण पद्धतीत बदल

Patil_p

ऍशेस मालिकेतील तिसरी कसोटी उद्यापासून

Patil_p
error: Content is protected !!