वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
स्पेनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू साऊल क्रेस्पोबरोबर इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया ओडिशा एफसी संघाने गुरुवारी नवा करार केला आहे. ओडिशा एफसी आणि पेस्पो यांच्यात एक वर्षासाठी हा करार झाला असल्याचे या क्लबच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
स्पेनच्या 25 वषीय पेस्पोने ला-लीगा फुटबॉल स्पर्धेत तसेच कोपा डेलरे स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. 2010 साली पेस्पोने एसडी पोनफेर्दिना डिव्हिजन ब फुटबॉल स्पर्धेत आपले पदार्पण केले होते. त्यानंतर तो सेगुंडा क्लबमध्ये दाखल झाला होता. पेस्पोने वरि÷ गटात 2015 सप्टेंबरला आपले पदार्पण केले होते. पोनफेर्दिनाबरोबर त्याचा तीन वर्षांचा करार होता. मध्यफळीत खेळणाऱया पेस्पोने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीतील पहिला गोल 2016 साली नोंदविला होता. 2022-23 च्या इंडियन सुपरलीग फुटबॉल हंगामासाठी ओडिशा एफसी संघाने आतापर्यंत सात फुटबॉलपटूंशी नवा करार केला आहे.