वृत्तसंस्था/ रियाध (सौदी अरेबिया)
बलाढय़ बार्सिलोना फुटबॉल क्लबने रविवारी येथे अंतिम सामन्यात रियल माद्रिद संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्सिलोना संघातर्फे गेव्ही, रॉबर्ट लिवानडोव्हेस्की आणि पेद्री यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाने रिअल माद्रिदवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. बार्सिलोनाचा पहिला गोल गेव्हीने नोंदविला. बार्सिलोनाचा दुसरा गोल लिवानडोव्हेस्कीने केला. गेव्हीने दिलेल्या पासवर लिवानडोव्हेस्कीने बार्सिलोनाची आघाडी वाढविली. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना बार्सिलोनाचा तिसरा गोल पेद्रीने केला. रियल माद्रिदतर्फे एकमेव गोल करीम बेझेंमाने 92 व्या मिनिटाला केला. 2023 च्या फुटबॉल हंगामातील बार्सिलोनाचे हे पहिले विजेतेपद आहे.