Tarun Bharat

सुनांसाठी होते विशेष आयोजन

Advertisements

या जिल्हय़ात साजरा होतो ‘बहुरानी दिन’

जगभरात अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात. कधी फादर्स डे तर कधी मदर्स डे साजरा होत असतो. परंतु आपण कधीच सुनांसाठीचा दिन (बहुरानी दिन) साजरा होताना पाहिला नाही. मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्हय़ात आता याची सुरुवात झाली असून तेथे अत्यंत अनोख्या प्रकारे हा दिन साजरा करण्यात येत आहे.

मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्हय़ातील महिलांनी 1 ऑक्टोबर रोजी बहुरानी दिन म्हणून साजरा करण्याचा पुढाकार घेतला. हा पुढाकार 2021 मध्ये घेण्यात आला असला तरी यंदा हा दिन विशेष स्वरुपात साजरा करण्यात आला आहे. सासू-सुनेत एक उत्तम आणि मधूर नाते निर्माण व्हावे म्हणून 1 ऑक्टोबर रोजी बहुरानी दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सासू अन् सुनेत माता-पुत्रीसारखे मधूर नाते निर्माण व्हावे या विचारासह राजगढ येथील लाल चुनर संस्थेने हा पुढाकार सुरू केला आहे. याचे परिणाम देखील सकारात्मक दिसून येत आहेत. या दिनी जिल्हय़ातील सर्व महिला, सासू-सुना परस्परांना पुष्प देऊन गळाभेट घेत होत्या. याचबरोबर या दिनाच्या अंतर्गत एका विशेष आयोजनात सून अन् सासूने मिळून केक कापला आहे. यादरम्यान सुनांनी सासूकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Related Stories

कर्तव्यपूर्तीच्या भावनेला सलाम

Patil_p

भारतीय महिलेला महत्त्वाचा पुरस्कार

Amit Kulkarni

गाझियाबाद प्रकरणी ट्विटरने अंग झटकले

Patil_p

झारखंडमध्ये राजकीय संकट कायम

Amit Kulkarni

नेपाळचा गोळीबार; भारतीय तरुण ठार

Patil_p

भारतात मागील 24 तासात 24,850 नवे कोरोना रुग्ण, 613 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!