केएमटीचा उपक्रम : उद्यापासून सेवेला प्रारंभ : शाहू मैदान ते शुगर मिल मार्गावर धावणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
केएमटीने केवळ महिला प्रवाशांकरिता विशेष बस सेवा सुरु केली आहे. शाहू मैदान ते आर.के.नगर, जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल अशी बससेवा आहे. या बस सेवेचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी 8 वा. श्री शाहू स्टेडियम येथून होणार आहे.
कोल्हापूर महापालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱया महिलांकरित “विशेष बस सेवा” सुरु करण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे प्रवाशांकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणास मिळालेल्या प्रतिसादानुसार श्री शाहू मैदान ते आर.के.नगर, जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल या मार्गावर फक्त महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरु करण्यात येत आहे. शालेय, महाविद्यालयीन महिला विद्यार्थीनी, महिला कर्मचारीसाठी ही बससेवा असणार आहे. श्री शाहू मैदान येथून आर.के.नगरा जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होऊन जिल्हा परिषद ा आर.के.नगर मार्गे श्री शाहू मैदान पर्यंत धावणार आहे. बसमध्ये महिला वाहक (कंडक्टर) कार्यरत असणार आहे. या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱया 3 ते 12 वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रवास करता येणार आहे.
बस सुटण्याची वेळ
श्री शाहू मैदान ते शुगरमिल शुगरमिल ते श्री शाहू मैदान
सकाळी 6.40 सकाळी 8.05
सकाळी 8.40 सकाळी 10.10
सकाळी 11.40 दुपारी 13.05
दुपारी 14.40 दुपारी 16.10
सांयकाळी 17. 35 सायंकाळी 18.10