Tarun Bharat

सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनातील दशावतारी नाटय़महोत्सवात सहभागी दशावतार नाटक मालकांचा खास गौरव

Special honor to Dashavatar drama owners participating in Dashavatari drama festival in Surangpani Vitthal Panchayat

ग्रामीण भागात लोकवस्तीपासून लांब निरव शांतता असलेल्या भागात प.पू. दादा पंडित यांनी परमेश्वरी संकेतानुसार व अध्यात्मिकतेच्या प्रचारासाठी तसेच भाविकांना मन:शांती लाभणाऱ्या अशा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानची केलेली निर्मीती हि एक सेवा आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना समाधान लाभते. भाविकांत अध्यात्मिकतेची प्रेरणा व देवभक्ती वाढविण्यासाठी या स्थळावर करीत असलेले उपक्रम याची खरी गरज आजच्या काळात आहे. असे प्रतिपादन मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी खानोली-सुरंगपाणी येथील दशावतार महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.


खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर दत्तजयंती निमीत्त आयोजित केलेल्या नाटय़महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व दशावतारी नाटय़मंडळाच्या मालकांचा मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलेश्वर दशावतार नाटय़मंडळातील कलाकार कै. शांती कलींगण यांच्या स्मरणार्थ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुषगुच्छ देवून खास श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक प. पू. दादा पंडित यांनी गौरव केला.

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Related Stories

सावंतवाडी तालुक्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू

NIKHIL_N

नादुरुस्त बार्ज तेथून हालविण्यात यावी. रेडी ग्रामस्थांची सरपंचाकडे मागणी.

NIKHIL_N

पोलीस विभागातर्फे ध्वनीक्षेपक यंत्रणा

NIKHIL_N

नको आता निराशा, आयुष्याला नवी दिशा…

NIKHIL_N

कुवारबाव बाजारेपेठेतही 45 मीटरचेच भूसंपादन

tarunbharat

राजापूर तालुक्यात शिकाऱ्याचीच झाली शिकार

Archana Banage