उत्तमप्रकारे वाढल्या जातात डिशेस
कित्येक घरात पाळीव प्राण्यांना घरचा सदस्य मानून सर्वप्रकारच्या सुविधा देण्यात येता. अशा स्थितीत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये स्वतःसोबत नेताना अडचण येत असते. हीच अडचण विचारात घेत एक असे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे, जेथे केवळ पाळीव श्वानांसाठी खाद्यपदार्थ तयार केले जातात.
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक विशेष रेस्टॉरंट असून तेथे उत्तम खाद्यपदार्थ मिळतात. येथे येणारे लोक स्वतःच्या पाळीव प्राण्यांना खाऊ घालू शकतात. कारण रेस्टॉरंटची विशेष सेवा श्वानांसाठी डिशेस तयार करते. या रेस्टॉरंटचे नाव डॉगू असून येथे श्वान आनंदी होईल असे सर्वकाही मिळते.
या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये श्वानांसाठी विशेष स्वरुपात तयार करण्यात आलेल्या पेस्ट्रीज अन् चारकोलद्वारे तयार करण्यात आलेले क्रीमी ड्रिंकही उपब्लध आहे. रविवारच्या दिवशी हे बेन ऍप्पेटिटे कॅफेत रुपांतरित होते. येथे श्वानांसाठी तयार करण्यात आलेली पेस्ट्री उत्तम शेफ्सच्या रेसिपीजपैकी एक ओ. केक अन् पेस्ट्रीचे अनेक प्रकार उपलब्ध असून ते श्वानांना आवडतात अशी माहिती रेस्टॉरंटचे मालक अन् शेफ रेहमी मॅसरवेह यांनी दिली ओ.
क्लासिक प्रेंच डिशेस
या रेस्टॉरंटमध्ये क्लासिकल प्रेंच खाद्यपदार्थ मिळतात असे मॅसरवेह यांनी सांगितले. काही लोकांना या रेस्टॉरंटची कल्पना प्रचंड आवडली आहे. तर काही जणांनी यावर टीकाही केली आहे. बेघर लोकांना अन्न पुरविण्यासाठी प्राण्यांना खाद्यपदार्थ वाढले जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.