मुंबई
गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत स्पेशालिटी रेस्टॉरंट्सचा समभाग जवळपास 122 टक्क्मयांची उसळी घेताना दिसला आहे. बीएसईवर शुक्रवारी इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 6 टक्के वाढत 268 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये समभागाचा भाव 20 टक्के इतका वाढला असल्याचेही दिसून आले आहे. शेअरबाजारात घसरणीचा सिलसिला सुरू असतानादेखील स्पेशालिटी रेस्टॉरंट्स समभाग मात्र चांगलीच कामगिरी करताना दिसला.