Spectacular International Success of English Medium School Talwade
एसओएफ ऑलंपियाड स्पर्धा क्षेत्रीय क्रमांकासह सुवर्णपदके
इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे’च्या विद्यार्थ्यांनी २०२२-२३ च्या सत्रातीलएसओएफ ऑलंपियाड फाउंडेशन तर्फे होणाऱ्या सामान्यज्ञान, इंग्लिश व गणित ऑलंपियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय विभाग व शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आणि सुवर्णपदके मिळवीली.
एसओएफ सामान्य ज्ञानावर आधारित ऑलंपियाड परीक्षा २०२२-२३ मध्ये प्रशालेतील कु. आर्या कुणकेरकर( इयत्ता दुसरी) हिने सामान्य ज्ञान परीक्षेत सुवर्णपदक पटकावत विभाग स्तरावर तिसरा क्रमांक व आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केला तसेच इंग्लिश ऑलंपियाड परीक्षेत कु. देवयानी निळकंठ नागडे (इयत्ता पहिली), रत्नाकर कोंडये( इयत्ता पहिली) यांनी आंतरराष्ट्रीय व विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. युवांशी प्रसाद नागडे (इयत्ता पहिली) हिने आंतरराष्ट्रीय व जिल्हास्तरावर दहावा क्रमांक मिळविला.
गणित ऑलंपियाड परीक्षेत कु.देवयानी निळकंठ नागडे (इयत्ता पहिली) हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर व जिल्हा स्तरावर सातवा क्रमांक प्राप्त केला तसेच कु.आराध्या सुशील पेडणेकर (इयत्ता पहिली) कु.जानवी केशव तुळसकर (इयत्ता दुसरी) कु. प्राची सुभाष परब( इयत्ता तिसरी)कु. आराध्या दाजी तळवणीकर (इयत्ता चौथी) या सर्व विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर प्रथम क्रमांक व सुवर्णपदक पटकावत यश संपादन केले.
प्रशालेच्या या उत्तुंग व अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेच्या संचालिका सौ. मैथिली मनोज नाईक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या परीक्षेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अजय बांदेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच या परीक्षेसाठी प्रशालेच्या शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
‘ सावंतवाडी प्रतिनिधी