Tarun Bharat

विद्यासागर करियर इन्स्टिटय़ूटची नेत्रदिपक कामगिरी

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा येथील विद्यासागर करियर इन्स्टिटय़ूटमध्ये विज्ञान विषयात शिकवणी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. श्रेया गावडे हिने 85 टक्के गुण प्राप्त केले आहेत. दर्जेदार निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यासागरचे संचालक डॉ. सातपुते यांनी अभिनंदन केले. 

याठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रिझनिंग ऍण्ड मेंटल ऍबिलिटी, गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांचे मूळ शिक्षण यंदापासून मोफत दिले जाणार आहे. आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवडय़ातून तीन दिवस नियमित शिकवणी व इतर तीन दिवस फाऊंडेशनचे कोचिंग दिले जाणार आहे. याशिवाय पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना रोज तीन तास शिकवणी दिली जाईल. या शिक्षणामुळेच जेईई व नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणे विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे. तसेच बारावी व पदवीनंतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला विद्यार्थी आत्मविश्वासाने सामारे जाऊ शकतील, असे डॉ. सातपुते यांनी सांगितले. विद्यासागर करियर इन्स्टिटय़ूट, वारखंडे फोंडा येथील अग्नीशामक दलासमोर विनायकी इमारतीच्या दुसऱया मजल्यावर आहे. सध्या अकरावी व बारावी विज्ञान तसेच वाणिज्य तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. 80 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

Related Stories

पेट्रोलपंपवर धांगडधिंगाप्रकरणी एकाला अटक

Patil_p

राज्यातील खाणी लवकरच सुरु करणार

Patil_p

वैष्णवी च्यारी हिला मोबाईल संच भेट

Patil_p

निसर्गावरील आघात संवेदनशील माणसांना वेदना देणारा !

Amit Kulkarni

मिराबाग येथे बेकायदा चिरेखाणीत ट्रक पाण्याखाली गेला

Amit Kulkarni

मगो पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार सोपटेंनी आणले विघ्न

Patil_p