Tarun Bharat

सट्टाबाजाराचे अनुमान भाजप विजयाचे

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीवर नेहमीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणावर सट्टा (बेटींग) लागला आहे. सट्टाबाजाराच्या अनुमानानुसार भापजला गुजरातमध्ये मोठे बहुमत मिळणार असून 125 ते 139 जागा मिळू शकतात. काँगेसला केवळ 40 ते 50 जागा एवढीच मजल मारता येईल. तर आम आदमी पक्षाला 5 ते 7 जागांपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असे या बाजारातील वातावरण आहे.

यामुळेच भाजपच्या विजयाच्या शक्यतेला सर्वात कमी भाव मिळत आहे. भाजपच्या विजयावर सट्टा लावणाऱयांना 1 रुपयावर केवळ 40 पैशाचा भाव दिला जात आहे. तर काँगेसच्या विजयाच्या शक्यतेवर 1 रुपयाला 6.25 रुपये, तर आम आदमी पक्षाच्या विजयाच्या शक्यतेला 1 रुपयामागे 25 रुपये भाव चालला आहे. सट्टा बाजाराच्या सूत्रानुसार ज्या पक्षाला कमी भाव मिळतो त्याच्या विजयाची शक्यता सर्वाधिक असते. या निवडणुकीवर किमान 500 ते 700 कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. सट्टा बाजाराचे अनुमान अनेकदा खरे निघते असा अनुभव आहे. मात्र ते चुकीचेही ठरु शकते. त्यामुळे प्रत्यक्ष परिणाम समोर आल्यानंतरच या अनुमानाची सत्यता किती आहे हे ठरणार आहे. तथापि, सट्टा बाजाराच्या अनुमानालाही निवडणुकीच्या खेळात महत्व देण्यात येते. आता 8 डिसेंबरला सर्व दुपारी 2 वाजेपर्यंत हिमाचल प्रदेशातील सर्व चित्र स्पष्ट होणार असून तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित आहे.

सर्व पक्ष आशावादी

सट्टा बाजार किंवा मतदानपूर्व सर्वेक्षणांची अनुमाने काहीही असली तरी भारतीय जनता पक्ष, काँगेस आणि आम आदमी पक्ष या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांनी द्वितीय टप्प्याचे मतदान होण्याआधीच त्यांच्या त्यांच्या विजयासंबंधी विश्वास प्रगट केला आहे. सलग विजयांचा विक्रम करण्याचा आत्मविश्वास भाजपने प्रगट केला आहे. तर काँगेसने भाजपची विजयाची श्रृंखला तोडण्याचा निर्धार व्यक्त केला. आम आदमी पक्षही गुजरातमध्ये चमत्कार घडण्याची आशा व्यक्त करीत आहे.

Related Stories

श्रीनगर चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav

काँग्रेसला द्रमुकने दिला झटका

Patil_p

‘या’ राज्यात 5 सप्टेंबरपासून सुरू होणार शाळा

Tousif Mujawar

उत्तराखंड : 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

कॅप्टन-भाजप-ढींडसा यांच्या आघाडीची घोषणा

Patil_p

बेंगळूरमध्ये आणखी तिघांना कोरोना

tarunbharat