सवलतीच्या दरात बसपासचे वितरण : प्रवास होतोय सोयीस्कर
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनकडून अंध, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी, हुतात्म्यांच्या पत्नी, वीरमाता आणि परिवहन मंडळाच्या निवृत्त कर्मचाऱयांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. वर्षभराच्या कालावधीसाठी हा बसपास दिला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना दैनंदिन शंभर किलो मीटरपर्यंतचा प्रवास करणे सोयीस्कर होते.
अंध, दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी परिवहनकडून सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. या बसपासचा लाभ घेऊन प्रवास करणाऱया लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. याचबरोबर लाभार्थ्यांच्या बसपासचे नूतनीकरणही करून दिले जाते. विभागीय संचार कार्यालयात या बसपाससंबंधीची कामे सुरू आहेत. सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करून या सेवेचा लाभ घेता येतो. 40 टक्क्मयांहून अधिक दिव्यांग व अंध असलेल्या व्यक्तींना केवळ 660 रुपयांत बसपास उपलब्ध करून दिला जातो.
याबरोबरच परिवहन मंडळामध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना देखील सवलतीच्या दरात बसपास दिला जातो. त्यामुळे त्यांनाही वर्षभर या बसपासच्या आधारे फिरता येते. यासाठी विभागीय संचार कार्यालयात संबंधितांची वर्दळ वाढली आहे.