नवी दिल्ली
स्पेन्सर्स रिटेल लिमिटेडने नव्या फॉरमॅटअंतर्गत देशभरातील विविध शहरात नवी स्टोअर्स सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. ‘स्पेन्सर्स व्हॅल्यू मार्केट’ या नावाने आगामी काळामध्ये टायर टू आणि इतर शहरांमध्ये त्यांची स्टोअर्स उघडली जाणार आहेत. या महिन्यामध्ये दक्षिण भारतातील 6 शहरांमध्ये नवी स्टोअर्स उघडली जाणार असून कंपनीची एकंदर 185 स्टोअर्स देशात आहेत. याकरिता किती गुंतवणूक करण्यात आली आहे याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.