जून-जुलैमध्ये वाढले व्यवहार ः यंदा कार्डअंतर्गत खर्चात 25 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱया खर्चामध्ये गेल्या जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या दोन महिन्यांमध्ये विक्रमी स्तरावर पेडिट कार्डच्या माध्यमातून लोकांनी खर्च केला असल्याचे दिसले आहे. सदरचा पेडिट कार्डचा वापर हा मागच्या दिवाळीच्या तुलनेमध्ये अधिक होता, असेही स्पष्ट झाले आहे.
पेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्याचे प्रमाण हे अद्यापही वाढतेच असून येणाऱया काळामध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
बँकिंग क्षेत्रातील तज्ञांच्या मते येणाऱया काळात गणेश चतुर्थीसह विविध उत्सव साजरे होणार असून या दरम्यान ग्राहक मोठय़ा प्रमाणामध्ये खरेदीवर जोर देतील. या खरेदीसाठी पेडिट कार्डचाच वापर होताना दिसेल. त्यामुळे येणाऱया काळातही पेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च वाढू शकतो असे या क्षेत्रातील तज्ञांना वाटते.
विविध आकर्षक योजना
उत्सवी काळाचा विचार करूनच विविध बँकांनी आपल्या पेडिट कार्ड वितरणासाठी आकर्षक योजनाही आणल्या असल्याचे सांगितले जाते. जास्तीत जास्त लोकांनी पेडिट कार्ड खरेदी करावे यासाठी बँका आणि वित्तसंस्था आकर्षक ऑफर्स आणू पाहात आहेत. गेल्या जून-जुलैमधला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च पाहता येणाऱया काळातही तो कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये क्रेडिट कार्डमार्फत खर्च चांगल्यापैकी होताना दिसत आहे. या तुलनेत पाहता हा खर्च विक्रमी स्तरावर पोहोचू शकतो.
इतर कंपन्यांशी भागीदारी
पर्यटनासह मनोरंजन यावरही मोठय़ा प्रमाणामध्ये खर्च केला जात असल्याची बाब समोर येते आहे. काही बँकांनी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी त्याचप्रमाणे स्विगी, झोमॅटो फूड डिलिव्हरी यांच्याशी भागीदारी केली असल्याचे सांगितले जाते.
18 लाख क्रेडिट कार्डचे वितरण
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार देशातील विविध बँकांनी जूनमध्ये 18 लाख क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. यासह पेडिट कार्डची संख्या ही 7 कोटी 82 लाख इतकी झाली आहे. ही संख्या मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 25 टक्के अधिक असल्याची माहिती आहे.