नवी दिल्ली
देशातील हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेट यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी येत्या 22 जुलैपासून जवळपास 26 नवीन उड्डाणे सुरु करणार असल्याचे समजते. यामध्ये नाशिक-दिल्ली, हैदराबाद-जम्मू, मुंबई-गुवाहाटी, झारसुगुडा-मदुरै, वाराणसी-अहमदाबाद आणि कोलकाता-जबलपूर आदी मार्गांवर ही थेट उड्डाणे सुरु करण्यात येणार आहेत. यासोबतच स्पाइसजेट अहमदाबाद-जयपूर, दिल्ली-हैदराबाद, दिल्ली-धर्मशाळा आणि अमृतसर-अहमदाबाद आदी मार्गावरुन उड्डाणांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याकरीता बोइंग-737 आणि क्यू 400 विमानांचा वापर करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.