वार्ताहर /खानापूर
जन्मोजन्मी हाच पती लाभू दे असे साकडे घालत पती-पत्नीचे नाते सातजन्मी लाभो अशी प्रार्थना करत अनेक सुवासिनींनी मंगळवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.
मंगळवारी दिवसभर वटपौर्णिमेच्या निमित्ताने खानापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वटवृक्षाला सुवासिनी आपल्या पतीराजाच्या दीर्घयुष्यासाठी साकडे घालताना दिसत होत्या. खानापूर शहरातील सती देवस्थान येथे महिलांनी पहाटेपासूनच पूजाविधी करण्यात मग्न होत्या.
तालुक्मयात शहरासह ग्रामीण भागात सुवासिनींनी सकाळपासूनच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन केले. मागील दोन वर्षात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने सुवासिनींना वटपौर्णिमा घरातच साजरी करावी लागली. जवळच्याच एका वटवृक्षाला सात फेऱया घालून आपल्या पतीराजाच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी पूजा केली.
शहर व ग्रामीण परिसरात अलीकडे वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करण्याची परंपरा वाढली आहे. अनेक ठिकाणी वडाचे झाड जवळपास मिळत नसले तरी वटवृक्षाच्या रोपटय़ाची अथवा फांदीची पूजा करण्याचीही अनेक ठिकाणी परंपरा जोपासली जात आहे.
पण खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील गावागावात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वटवृक्षाची झाडे अधिक प्रमाणात असल्याने पारंपारिकरीत्या जोपासल्या जाणाऱया वटवृक्षाला पूजेचा पहिला मान देण्याची परंपरा आहे. खानापूर तालुक्मयातील अनेक गावांमध्ये वटपौर्णिमा साजरी करून आपल्या पतीराजासाठी नामस्मरण करण्याचा हा दिवस सुवासिनींनी भक्तिभावाने आचरणात आणला.