ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याच्या (SPO) घरात घुसून बेछूट गोळीबार केला. रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत माजी एसपीओ फैयाज अहमद, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यांनतर काही वेळातच अहमद आणि त्यांच्या पत्नीने प्राण सोडला. अहमद यांची मुलगी रफिया हिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काश्मीर पोलिसांनी हरिपरीगाम गावाला वेढा दिला असून, शोधमोहिम सुरू आहे.