Tarun Bharat

‘विद्यार्थी कट्टा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response of students to ‘Vidyarthi Katta’

वेंगुर्ले तालुकास्तरीय त्रैवार्षिक तिसऱ्या मराठी साहित्य संमेलना अंतर्गत आयोजित केलेल्या ‘विद्यार्थी कट्टा‘ या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत काव्यवाचन सादर केले.
येथील पाटकर हायस्कूल येथे आनंदयात्री वाङमय मंडळातर्फे घेतलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन प्रतिथयश गायक, निवेदक शैलेश जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष वृंदा कांबळी, सचिव सचिन परुळेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, महेश राऊळ, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे, प्रा.महेश बोवलेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थी कट्टामध्ये माधव ओगले (भेळचा मेळ), दुर्वा गांवकर (झाड), चिन्मय मराठे (खाऊ), भार्गव ओगले (नाटक फसते तेव्हा), विठ्ठल मांजरेकर (सांगा कसे जगायचे), अनुष्का शिगाडे (महराष्ट्र), संकेत परुळेकर (असा श्रावण येतो), निखिल हळदणकर (या झोपडीत माझ्या), प्रथमेश जोशी (तू झालास समाजाचा मूकनायक), प्रिती पाटकर (रान पाखरा), दिशा पडवळ (चवदार तळ्याचे पाणी), तर गायत्री मांजरेकर (शिवाजी राजे) यांच्यावर काव्यवाचन केले. विद्यार्थी कट्टा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Related Stories

मालवण गाबित समाजतर्फे गुणवंतांचा १७ जुलै रोजी सत्कार

Anuja Kudatarkar

नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांवर देवरुख पोलिसांची कारवाई

Archana Banage

आज सात वर्षांनी मी हिम्मत दाखवू शकले…

NIKHIL_N

Ratnagiri : कोकण रेल्वेचे मुद्रीकरण केल्यास प्रवाशांवर उभी राहणार भाडेवाढ

Abhijeet Khandekar

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

NIKHIL_N

आमदार असताना स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष केल्याचा केसरकरांना विसर- डॉ.जयेंद्र परुळेकर

Anuja Kudatarkar