Tarun Bharat

मडगाव रवींद्र भवनच्या आकाशकंदील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /मडगाव

दिवाळी सणाचे औचित्य साधून मडगाव रवींद्र भवनने आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत एकूण 33 मुलांनी भाग घेऊन ही कार्यशाळा यशस्वी केली. या कार्यशाळेत आकाशकंदील बनविण्याचे मार्गदर्शन दिपेश हजारे, सोनू नाईक व चिन्मय बोरकर यांनी केले.

कार्यशाळेच्या समारोप सोहळय़ाला रवींद्र भवनचे सदस्य सचिव आग्नेलो फर्नांडिस तसेच रवींद्र भवनचे अध्यक्ष नारायण सावंत (आयएएस) कला आणि संस्कृती खात्याचे सचिव उपस्थित होते. आग्नेलो फर्नांडिस यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांचे तसेच इतर उपस्थित लोकांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना नारायण सावंत यांनी पालकांनी आपल्या मुलांना कार्यशाळेत पाठवून त्यांना आपली संस्कृती जपण्यासाठी प्रवृत्त केल्याने पालकांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

रवींद्र भवनच्या सांस्कृतिक संयोजक सौ. बिंदिया वस्त नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन सहाय्यक सांस्कृतिक अधिकारी सौ. पुनम बुधलकर यांनी केले.

Related Stories

आंचिम समारोपाला झिनत अमानची उपस्थिती

Amit Kulkarni

तिवरे शांतादुर्गा देवस्थान समितीची निवड

Amit Kulkarni

काँग्रेसकडे आता चारच आमदार

Amit Kulkarni

गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन सुरुच. आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Omkar B

मधलामाज मांद्रेतील स्वयंघाषित लॉकडाऊन यशस्वी

Omkar B

काणकोण कदंब बसस्थानक परिसराचे निर्जंतुकीकरण

Omkar B