1200 स्पर्धकांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
लेकव्हय़ू फौंडेशन आयोजित बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठय़ा उत्साहात रेसकोर्स मैदानापासून सुरूवात झाली. या स्पर्धेत 1200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एमएलआयआरसीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, डीआयजी राघवेंद्रन, ब्रिगेडिअर दयालन, संगमेश निरानी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते 21 किमी, 10 किमी व 5 किमी फन रन याचे ध्वज उंचावून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एमएलआयआरसीचे जवान, पोलीस अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर स्पर्धकांनी भाग घेतला होता.