Tarun Bharat

कोलगावात वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to costume contest in Kolgaon

१ ते १० वयोगटातील मुलांचा सहभाग

कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेषभूषा स्पर्धेत आराध्या कृष्णकांत परब प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत माही निशिकांत पडते याने द्वितीय क्रमांक तर वेदश्री वैभव परब यांने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठीदूर्वाश कृष्णा तर्फे आणि निधी नाईक यांची निवड करण्यात आली.
या वेषभूषा स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर दुरभाटकर यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेला कोलगावमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या एक ते दहा वयोगटातील मुलांनी या वेषभूषा स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. दुर्भाटकर यांच्या आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्पर्धेतील सर्व विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांना माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

डाक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष हरियाण तर सचिवपदी तुकाराम गावडे

Anuja Kudatarkar

खासदार तटकरेंविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव

Patil_p

चिपळूण येथील 16 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू

Archana Banage

जागतिक किर्तीचे ‘बाँम्बे ब्लड ग्रुप’ रक्तदाते विक्रम यादवांचे रक्तदानासाठी सिंधुदुर्गात

NIKHIL_N

जिल्हा रुग्णालयात दुसरा ऑक्सिजन प्लांट

NIKHIL_N

आणखी 99 कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N
error: Content is protected !!