Tarun Bharat

कावळेवाडी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोनू कुमार, आकांक्षा गणेबैलकर, प्रेम बुऊड प्रथम क्रमांकाचे मानकरी

वार्ताहर /किणये

कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व सामाजिक संस्थेच्यावतीने  रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुरुषांच्या खुल्या गटांमध्ये मोनू कुमार, महिलांच्या खुल्या गटांमध्ये आकांक्षा गणेबैलकर व 14 वर्षाखालील गटामध्ये प्रेम बुरुड यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन मोरे होते. माजी महापौर शिवाजी सुंठकर, हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मनोळकर आदींच्या हस्ते फत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पी. आर. गावडे यांनी उपस्थितांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर रामचंद्र मनोळकर, शशिकांत मोरे, नागेंद्र नायक, मोहन तरवाळ, वसंत अष्टेकर, बबन कांबळे, यशवंत मोरे, के. आर. भाष्कळ, पी. एस. भास्कर, अनंत पाटील, बाळासाहेब सपारे, पुंडलिक पावशे, एल.जी.कोलेकर, रेणू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कावळेवाडी गावात राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व  क्रीडा आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही कौतुकास्पद  बाब आहे, असे मनोगत शिवाजी सुंठकर यांनी व्यक्त केले.

या तिन्ही गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी रेणू पा. गावडे यांचा विशेष सत्कार सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन सूरज मोरे यांनी केले व आभार मनोहर प. मोरे यांनी मानले.

Related Stories

आरटीओ मैदानानजीक ‘बर्निंग कार’

Amit Kulkarni

डुकरांमुळे हैराण; शेतकऱयाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली

Omkar B

ऐनापूर येथे गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक

Patil_p

गरजूंना होणार अडीच हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Patil_p

केंद्राकडून कर्नाटकाला सापत्नभावाची वागणूक

Amit Kulkarni