Tarun Bharat

लोकविश्वास प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /फोंडा

ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात 25 पुरुष व 14 महिलांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन फोंडय़ाचे मामलेदार विमोद दलाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी समाज कार्यकर्ते साईश पाणंदीकर, संस्थेचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर, सचिव सविता देसाई, आनंद देसाई आदी उपस्थित होते. विमोद दलाल यांनी लोकविश्वास प्रतिष्ठानतर्फे राबविल्या जाणाऱया समाजोपयोगी उपक्रमाची प्रशंसा केली. डॉ. पाश्कोल डिसोझा यांनी रक्तदानाचे महत्त्व व फायदे सांगितले. अनुप प्रियोळकर यांनी स्वागत केले तर सविता देसाई यांनी आभार मानले.

Related Stories

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

Amit Kulkarni

राखीवता रद्द होण्यास सरकार जबाबदार

Amit Kulkarni

खेळाडू फंडार्थ लढतीत धेंपोची स्पोर्टिंग क्लबवर 4-2 अशी मात

Amit Kulkarni

उसगांव येथून 2 लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Amit Kulkarni

बेशिस्तपणावर लगाम लावणार

Amit Kulkarni

कदंबला महिन्याकाठी आठ कोटींचा फटका

Patil_p