बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव 2023’ला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शनिवारी दुसर्या दिवशी अन्नोत्सवाला नागारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार असल्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत नागारिकांनी अन्नोत्सवाला उपस्थिती दर्शविली. सुमधूर गीतांच्या सुरांमध्ये खाद्य पदार्थांचा खवय्यांनी आस्वाद घेतला.
सावगाव रोड, नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर भव्यदिव्य अन्नोत्सव साकारण्यात आला आहे. नागारिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून यावर्षी मोठ्या जागेमध्ये अन्नोत्सव आयोजित केला आहे. स्थानिक खाद्य पदार्थांसमवेत देशभरातील चमचमीत, चटपटीत खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. कर्नाटकमधील खाद्यपदार्थांसोबत महाराष्ट्रीय, बंगाली, पंजाबी, काश्मिरी असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत.
शनिवारी शाळा-महाविद्यालयांना अर्धा दिवस सुटी असल्यामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून मोठी गर्दी झाली होती. सुफी, कव्वाली, पंजाबी या गीतांचा आस्वाद घेत खवय्यांनी व्हेज, नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारला. खाद्य पदार्थांसमवेत ज्वेलरी, कपडे, चप्पल, गृहोपयोगी वस्तु यांचे स्टॉल नागाfरकांची गर्दी खेचत आहेत. बेळगाव रेल्वे स्थानकापासून नानावाडीला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आल्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.